logo

पिठाची गिरणी चालवणाऱ्या या शेतकऱ्याने आपल्या 7 ही मुलींना पोलीस अधिकारी बनवून जगासमोर एक नवा आदर्श मांडलाय.......

बिहार - सारण जिल्हा
आमिर खानच्या ‘दंगल’ या सुपरहिट चित्रपटात एका वडिलांना जगाला सांगावे लागते की ‘त्याच्या मुलीही मुलांपेक्षा कमी नाहीत’. मुली मुलांपेक्षा कमी नसतात हे १००% खरे आहे. या चित्रपटात हरियाणाच्या महाबीर फोगटची कथा दाखवण्यात आली होती, ज्यांच्या मुली भारतातच नव्हे तर जगभरात खूप प्रसिद्ध आहेत. महाबीर फोगट यांच्या मुला-मुलींबद्दलच्या समान भावनेने गीता फोगट, बबिता फोगट, संगीता फोगट आणि विनेश फोगट हे जगातील सर्वोत्तम कुस्तीपटू बनले आहेत. केवळ ‘फोगट सिस्टर्स’च नाही तर आज मुली प्रत्येक क्षेत्रात आपल्या आई-वडिलांचा आणि देशाचा गौरव करत आहेत.

गोष्ट बिहारच्या राजकुमार सिंगची आहे. आज आम्ही तुम्हाला राजकुमार सिंह यांच्या 7 मुलींची यशोगाथा सांगणार आहोत, ज्यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर ते स्थान मिळवले जे त्यांच्या जिल्ह्यातील इतर मुली मिळवू शकल्या नाहीत. बिहारमधील सारण जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या 7 मुलींनी पोलीस अधिकारी बनून एक अनोखा आदर्श ठेवला आहे.
पिठाची गिरणी चालवणाऱ्या या शेतकऱ्याने आपल्या 7 ही मुलींना पोलीस अधिकारी बनवून जगासमोर एक नवा आदर्श मांडलाय..


नक्की कोण आहे राजकुमार सिंग आणि कश्या त्यांच्या सर्व मुली झाल्या पोलीस अधिकारी?

गेल्या काही दिवसांपासून बिहारच्या ‘7 अधिकारी मुलींची’ यशोगाथा सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. बिहारमधील सारण जिल्ह्यातील एका छोट्या गावात पिठाची गिरणी चालवणाऱ्या राजकुमार सिंह यांना ७ मुली आणि १ मुलगा आहे. राजकुमार सिंग एकेकाळी त्यांच्या ९ लोकांच्या कुटुंबासह एका खोलीच्या घरात राहत होते, पण आज त्यांच्या मुलींच्या यशामुळे त्यांना त्यांच्या वृद्धापकाळात इतरांकडे मदतीचा हात पुढे करणे थांबले आहे. त्यांच्या पालकांनी त्यांचे वृद्धापकाळ शांततेत पार पाडावे यासाठी मुलींनी एकत्रितपणे त्यांच्यासाठी दोन घरे बांधली आहेत.
राजकुमार सिंह यांना एकेकाळी त्यांच्या मुलींमुळे लोकांकडून टोमणे मारावे लागले होते, पण आज त्यांच्या मुलींचे यश पाहून लोक त्यांचा आदर करतात. मात्र, आजही असे अनेक लोक आहेत जे राजकुमार सिंह यांच्या मुलींचे यश पाहून त्यांना विचारतात की, त्यांच्या मुलींना सरकारी नोकरीत लावण्यासाठी किती पैसे दिले? पण सत्य हे आहे की ,त्यांच्या सातही मुलींनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर या नोकऱ्या मिळवल्या आहेत.

राजकुमार सिंह यांच्या 7 मुलींपैकी मोठी राणी कुमारी सिंह बिहार पोलिसात कार्यरत आहे, दुसरी मुलगी रेणू कुमारी सिंह एसएसबीमध्ये, तिसरी मुलगी सोनी कुमारी सिंह सीआरपीएफमध्ये, चौथी मुलगी प्रीती कुमारी सिंह गुन्हे शाखेत, पाचवी मुलगी पिंकी कुमारी सिंह सहावी मुलगी रिंकी कुमारी सिंग अबकारी पोलिसात, तर धाकटी मुलगी नन्ही कुमारी सिंग जीआरपीमध्ये कार्यरत आहे. त्यांच्या या सर्वच मुली ह्या देशाच्या रक्षणासाठी कार्यरत असल्याने त्यांचा आम्हाला खूप अभिमान आहे असे राजकुमार सिंह सांगतात.
एकंदरीत त्यांच्या मुलींमुळे आज त्यांचे नाव सर्वत्र गाजत आहे.

76
5294 views